Krushnkant Desai
- Posted by Archana Kunjir
- Categories Blog
- Date 07/10/2023
- Comments 0 comment
नमस्कार मी कृष्णकांत पांडुरंग देसाई.
मुंबई भांडुप येथे राहत असून शेअर मार्केट मध्ये कामाला आहे . कोरोंना मुळे लॉकडाऊन सुरू झाल आणि आमचं Work From Home सुरू झालं . शेअर मार्केटचं Time Fix असल्याने संध्यायकळी ४ नंतर काम नसायचे व लॉकडाऊन मुळे बाहेर फिरणं शक्य नहोत . संध्याकाळचा वेळ मोबाइल आणि टीव्ही पाहण्यात वाया जात होता .
अशातच एक दिवस आमच्या शाळेच्या What’s App Group वर एका मैत्रिणीने “‘क’ कॅलिग्राफी” क्लासची जाहिरात फॉरवर्ड केली . त्यामध्ये ऑनलाइन कॅलिग्राफी शिका अशी जाहिरात होती . मलाही चित्रकलेची आवंड असल्याने बघू जमतय का असा विचार करून दिलेल्या नंबर वर फोन केला तेव्हा श्री शरद कुंजीर सरांशी बोलणं झालं . त्यांनी संपूर्ण कोर्स ची रूपरेषा समजाऊन सांगितली . मग मी ही करून बघू या उद्देशने Admission घेतले . क्लास संध्याकाळी ऑनलाईन असल्याने काही अडचण नव्हती. शरद सरांच्या पत्नी सौ . अर्चना कुंजीर मॅडम फार छान समजाऊन शिकवत होत्या. क्लास झाला की त्याचा सराव करण्यात वेळ कसा जायचा ते कळतच नव्हत . शरद सर आणि अर्चना मॅडम एवंढ सुंदर शिकवत होते की माझं देवनागरी कधी शिकून झालं हे समजलही नाही . नंतर मी त्यांच्याकडे इंग्रजी आणि ब्रशपेन कॅलिग्राफीही शिकलो .
इथे मला आवर्जून सांगायला आवडेल की सर आणि मॅडम यांचा स्वभाव ,बोलणं आणि शिकवणं फारच सुंदर आणि अप्रतिम आहे . कधीचं त्यांनी काही विचारलं तर टाळाटाळ न करता समजाऊन सांगितलं आणि नेहमीच प्रोत्साहन दिलं . शरद सर तर नेहमीच क्लास व्यतिरिक्त वेगवेगळे डेमो सेशन अरेंज करून विद्यार्थ्याना नवीन काहीतर शिकवण्याच्या प्रयत्नात असतात .
शरद सरांनी तर ‘प्रेरक सुवचनांचे सुलेखन’ या सदराखाली त्यांच्या विद्यार्थ्यानसाठी त्यांनी केलेल्या निवडक कामाचं प्रदर्शनही भरवले होते . मला तर कधी स्वप्नातही माझं काम प्रदर्शनात सामील होईल वाटलं नव्हतं. पण सर आणि मॅडम यांच्यामुळे माझं आणि माझ्यासारख्यांच स्वप्न पूर्ण झालं . आणि महत्वाचं म्हणजे माझं एक आर्टवर्कही सेल झालं. अश्याप्रकारचं विद्यार्थ्यानसाठी कॅलिग्राफीच प्रदर्शन भरवलेल मी तरी पहिलं नव्हत . या प्रदर्शनात मला स्थान मिळालं यासाठी मी सर आणि मॅडम यांचा ऋणी आहे .
“‘क’ कॅलिग्राफी” म्हणजे फक्त क्लास नसून एक कुटुंब आहे . आपण शिकता शिकता कधी या कुटुंबाशी एकरूप होतो हे आपल्याला समजतंच नाही . खरंच शरद सर आणि अर्चना मॅडम मी स्वतःला खूपच भाग्यवान समजतो की मला तुमच्याकडे शिकता आलं.
खरोखरच जर कॅलिग्राफी शिकायची आणि स्वतःमध्ये रुजवायची असेल तर “‘क’ कॅलिग्राफी” हा एकंच पर्याय आहे..
पुन्हा एकदा शरद सर आणि अर्चना मॅडम तुम्हा उभयतांना खूप खूप धन्यवाद ..
पुढील यशस्वी वाटचाली साठी शुभेछ्या .. ..
आपला विद्यार्थी
कृष्णकांत पांडुरंग देसाई
(भांडुप ,मुंबई )
९८६७१६७७७६