Avinash Nimse (Civil Engineer)
- Posted by Archana Kunjir
- Categories Blog
- Date 02/10/2023
- Comments 0 comment
एका सुट्टीच्या दिवशी फेसबुक वर “ रविवार(Sunday) “ ह्या शब्दाने माझे लक्ष आकर्षित करून घेतले होते कारण त्याचा वळणदारपणा,दोन रंगाचा सुंदर मिलाफातून मला त्याच्या पेज वर घेऊन गेले तर ते पेज होते “‘क’ कॅलीग्राफी (‘K’ Calligraphy “ या संस्थेचे ज्याचे संस्थापक “श्री.शरद कुंजीर” व “सौ.अर्चना कुंजीर” आहेत.
मला सुलेखन आर्थात कॅलीग्राफी बरेच वर्षापासून शिकायची होती. पण तसा योग व वेळ मिळत नव्हता. तो काळ साधारण मार्च 2020 चा होता. तेव्हा ठरवले आपन शिकूयात पण क्लास ला प्रत्यक्ष जाऊन शिकणे शक्य नव्हते मग परत पुढे ढकलले.
आणि तेवढ्यात एप्रिल 2020 ला लॅकडाऊन लागला,मला वेळ च वेळ होता व मी चौकशी केली तर “ऑनलाईन (Online)” क्लास चालू होते ,मी लगेच जॅईन केला. सुरवात श्री.शरद कुंजीर सरांनी केली व पुढील क्लास अर्चना मॅडम ने घेतले. मला आगदी नियमीत क्लास करने शक्य झाले नाही पण रोजचा सराव मात्र मी नियमीत करत होतो. शरद सर मला मधून मधून मार्गदर्शन करत होते, व माझ्या सरवाला प्रोत्साहन देत होते, व सुधारणा करण्यास सांगत होते.
मी माझा सराव मात्र कायम ठेवला आगदी कुठेही बाहेर गावी गेलो तरी ( तिरूपती बालाजी , गणपती पुळे , बंगलोर , चारधाम यात्रा ) सोबत साहीत्य ठेवून सराव नियमित करत होतो.
शरद सरांचे व माझे जन्मगांव जवळच असल्याने आमची चांगली मैत्री झाली. मला सामाजिक कामाची आवड असल्याने त्यांनी त्यांची समाजीक आवड मला बोलावून दाखवली व आम्ही सुरवात केली.
पहिल्यांदाच “महिला दिनानिमित्त “ पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात “कॅलीग्राफीचे प्रत्यक्षीक व सर्व महिलांचे नाव” लिहून दिले.
यशवंतराव चव्हाण नाटय़गृहात, कोथरूड येथेही कार्यक्रम झाला.
मे 2023 ला जवळपास 22 सुलेखनकार च्या मदतीने “बालगंधर्व “ रंगमंदिरातील कलादालनात “प्रेरक सुवचनांचे सुलेखन” हे मोठे प्रदर्शन भरवले ज्यात 250 विविध प्रेरक सुवचने होती, मी पुणे महापालिकेचा स्वच्छता राजदूत ( ब्रॅन्ड ऑमबेसिडर) असल्याने स्वच्छते बद्दल ची प्रेरक कोटस मी लिहले होते.
या भव्य प्रदर्शनाचे उद्घाटन लोकप्रिय लेखक श्री.शिवराज गोर्ले व म.न.पा. उपायुक्त सौ.आशा राउत व मिस इंडिया ईशा आगरवाल होत्या.
15 ऑगस्ट 23 ला आम्हांस बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील डोमरी या गावी ” सोनदरा गुरूकुलम “ येथे प्रमुख पाहुणे होतो. तेथे बुक-क्लब तर्फे पुस्तकं व “शरद कुंजीर” सरांनी सुलेखनाचे 220 विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व कॅलीग्राफीचे प्रात्यक्षिक ही करून दाखवले त्या मुलांना हे सर्व नवीन होते ते अगदी भारावून गेले होते..
नुकतेच शशिकला फाउंडेशन तर्फे १० मुलांना शरद सर ऑनलाईन सुलेखन शिकवत आहेत.
तसेच भोर येथेही स्मृतिप्रित्यर्थ प्रशिक्षणाचा कार्यक्रम घेतला.
शरदसरांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यानां केव्हाही म्हटले की सर कार्यक्रम करायचा आहे ते लगेच तयार आसतात. कधी कधी तर ते ऑफिसला सुट्टीही घेतात.
विद्यार्थ्यांसोबत वेळ घालवून त्यांना आपल्या “मृदु” शैलीतून अगदी बारकावे समजावून सांगणे व प्रत्येकाला ” प्रोत्साहन देणे! हे मी मागील 3 वर्षापासून पहात आहे.
माझा सराव आजही नियमीत चालू आहे कारण शरद सरांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन ते कधीही नकारात्मक सांगत नाहीत चुका सांगत नाहीत…तर केलेल्या लेखनात आणखी उत्तम कसे करता येईल हे सांगतात! त्यामुळेच आपण केलेले काम चांगले आहे व आणखी चांगले करण्याचा प्रयत्न केला जातो.
हीच “कला” शरद सर सर्वाना शिकवतात. हेच त्यांचे वेगळेपण ” आहे.
आम्ही पुढे मोठे मोठे प्रकल्प सोबत करणार आहोतच.
आमचे दोघांचेही उद्दिष्ट “देवनागरी व सुलेखन ( Calligraphy)“ कला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवण्याचे आहे त्यामुळे विद्यार्थ्यांसोबत जास्तीत जास्त काम करण्याचे आम्ही ठरवले आहे.
मला सुलेखनात भरपूर प्रोत्साहन दिल्याबद्दल मी शरद सरांचा व अर्चना मॅडमचा आभारी आहे ! त्यांच्या सर्व टिमला पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा!!
आपला विश्वासू.
श्री.अविनाश बबन निमसे.
स्थापत्य अभियंता ( सिव्हिल इंजीनिअर)
संस्थापक- बुक-क्लब,पुणे.
स्वच्छता राजदूत ( ब्रॅन्ड अॕम्बॕसिडर “पुणे महानगरपालिका.
सुलेखनकार.
सभासद- महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्था,पुणे.
ई.मेल – bookclub.avinash@gmail.com
फोन नंबर – 9511626782.
Tag:calligraphy, feedback, review, students
You may also like
Krushnkant Desai
नमस्कार मी कृष्णकांत पांडुरंग देसाई. मुंबई भांडुप येथे राहत असून शेअर मार्केट मध्ये कामाला आहे . कोरोंना मुळे लॉकडाऊन सुरू झाल आणि आमचं Work From Home सुरू झालं . शेअर मार्केटचं Time Fix असल्याने संध्यायकळी ४ नंतर काम नसायचे व …